मराठी भाषा गौरव दिन : एसटीमध्ये साजरा होणार मराठी वाचन सप्ताह

मराठी भाषा गौरव दिन : एसटीमध्ये साजरा होणार मराठी वाचन सप्ताह
अकोला : ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज (वि.वा. शिरवाडकर) यांच्या २७ फेब्रुवारीच्या जन्मदिनापासून मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचा संकल्प महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आणि मंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केल्याने मंगळवार, २७ फेब्रुवारीपासून प्रत्येक एसटीमध्ये मराठी वाचन सप्ताह साजरा होणार आहे.
मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने आणि सप्ताहाच्या निमित्ताने राज्यातील प्रत्येक बसस्थानकावर मराठी भाषेतील पुस्तके, ग्रंथ, काव्यसंग्रह, प्रवासवर्णने यांच्या विक्रीची दालने उभारली जाणार आहेत. विविध प्रकाशन संस्था, पुस्तक विक्री केंद्र यांच्याद्वारे प्रवासी व एसटी कर्मचाºयांना सवलतीच्या दरात पुस्तके विक्री केली जाणार आहेत. त्यासाठी मराठी पुस्तक प्रकाशन संस्था व विक्री दुकानांना बसस्थानकांवर पुस्तक विक्री दालन उभे करण्यासाठी एसटी महामंडळातर्फे विनामूल्य मोकळी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आपले योगदान देत मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. वाचन संस्कृती वाढविणे, मराठी भाषेतील अभिजात लेखन संस्कृती जोपासणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. एसटीने दररोज प्रवास करणाºया सुमारे ७० लाख प्रवाशांना विविध लोकनेत्यांची चरित्रे, कथा, कादंबºया, काव्यसंग्रह, मौलीक ग्रंथ, असे विविधांगी लेखन साहित्य उपलब्ध होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *